मांडवा जेट्टीजवळ बोट पेटली, दोन जण जखमी

रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील मांडवा जेट्टीजवळ एका बोटीला आग लागली असून या आगीत दोन जण जखमी झाले आहेत.बेल्वेडियर नावाच्या एका खासगी स्पीड बोटला ही आग लागल्याचे समजते.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेव्हा बोटीला आग लागली तेव्हा बोटीत दोन जण होते. ते दोघेही होरपळले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आग लागल्याने तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र हा सर्व प्रकार समुद्राच्या मधोमध होत असल्याने फारशी मदत होऊ शकली नाही. बोटीत भरपूर इंधन होते आणि ती बराच वेळ जळत राहिली. मात्र या स्पीडबोटीला आग कशी लागली हे समजलेले नाही.