आंबा कॅनिंगसाठी रत्नागिरीतील एक्सॉटिक कंपनी सुरू करण्याचा प्रयत्न

आंबा उत्पादकांमध्ये दोन प्रकार आहेत एक पेटीतून आंबा पाठवणारे आणि दुसरे कॅनिंगसाठी आंबा पाठवणारे आहेत.रत्नागिरीतील एक्सॉटिक हि कंपनी सुरु करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे.जे आंबा व्यवसायिक होम डिलिव्हरी करणार आहेत ते सोसायटीत जाऊन आंबा विक्री करू शकतात तसेच मासेमारी नंतर मच्छी लिलाव करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्वाचे आहे असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आंबा बागायतदारांची बैठक पार पडली.त्याबैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ते म्हणाले की, जे आंबा बागायतदार गुजरात, राजस्थानला कॅनिंगसाठी आंबा पाठविणार आहेत ते आंबा पाठवू शकतात.रत्नागिरी जिल्हा ऑरेंज झोन मध्ये असून त्यासंदर्भात माहिती व मार्गदर्शक सूचना लवकरच प्राप्त होतील असे सामंत यांनी सांगितले.जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अनेक तक्रारी येत आहेत त्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णय घेईल असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या