आंब्याचा बागा शोषून घेतात लाखो टन कार्बन डायऑक्साईड, IIHR चे संशोधन

137

सामना ऑनलाईन । मुंबई

फळांचा राजा समजला जाणारा आंबा प्रत्येकाच्याच आवडीचा आहे. आंबा आणि आंब्यापासून बनविले जाणारे पदार्थ हे फक्त देशातच नाही तर जगभरात चवीने खाल्ले जातात. अशा या चवदार आंब्याबाबतची एक नवी माहिती उजेडात आली आहे. महाराष्ट्रातील आंबाच्या बागा वर्षाला लाखो टन कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात असं संशोधनातून सिद्ध झाले आहे. कोकण, गोवा आणि कर्नाटकात असलेल्या आंब्याच्या बागांमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड लक्षणीय प्रमाणात कमी होतो असे इंडियन काऊन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रीसर्चज आणि इंडियन इन्स्टिट्युट होरिकल्चर रीसर्च या संस्थांनी केलेल्या संशोधनामध्ये दिसून आलं आहे.

कोकण, गोवा आणि कर्नाटक या भागात मिळून 1 लाख 6 हजार 210 हेक्टरवर आंब्याच्या बागा आहेत. या बागांमुळे  हवामान बदलावर सकारात्मक परिणाम होत आहे. या बागेतील झाडे वर्षाला 90 कोटी मेट्रीक टनापेक्षा अधिकचा कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात. देशात सर्वाधिक आंबा बागायतीचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील आंबा बागायत वर्षाला 9 मेट्रिक टन कार्बन डाय ऑक्साईड शोषतात.

देशातील आंबा बागायत क्षेत्रापैकी 47 टक्के बागा या महाराष्ट्रात आहेत. यातील बहुतांश आंबा बागायत या खडकाळ जमिनीवर आहे. 17 टक्के बागा या पडीक जमिनीवर आहेत तर 5 टक्के बागायती या वनसंपदा नष्ट झालेल्या जमिनीवर आहेत. वर्षाला 21 लाख गाड्या जेवढ्या कार्बन वायू हवेत सोडतात  तितकाच कार्बन डायऑक्साईड वायू या बागा शोषत असल्याचं  या संशोधनात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या