मैतेई संघटनेच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी इम्फाळ पूर्व भागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित कुमार मोईरंगथेम यांचे मंगळवारी अपहरण केल्यामुळे सशस्त्र दलांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलीस आणि सुरक्षा दलांनी तातडीने हालचाली करत त्यांची सुटका केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ एक हजारांहून अधिक पोलीस कमांडोंनी आज प्रतिकात्मकरित्या शस्त्र खाली ठेवली आणि यापुढे हल्ला झाल्यास कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाविना आम्हाला प्रत्त्युत्तर देण्याची मुभा मिळावी अशी मागणी केली.
इम्फाळ पश्चिम आणि पूर्व, विष्णूपूर, थौबल, काकचिंग या पाच जिह्यांतील कमांडोंनी या हल्ल्याच्या निषेधार्थ आपली शस्त्रs खाली ठेवली होती. मैतेई जहालवादी गट अरंम्बाई टेंग्गोल आणि मेईरा पैबीस (महिला स्वयंसेविकांचा गट) यांच्यावर कारवाईचीही त्यांनी मागणी केली. या संघटनांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यालाच थेट पळवून नेताना अमित कुमार यांच्या घरात अंदाधुंद गोळीबारही केला होता.