वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या फलंदाजावर फसवणूक केल्याप्रकरणी एक वर्षाची बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंड़र -19 च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या मनजोत कालरावर फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली क्रिकेट बोर्डाने एक वर्षाची बंदी घातली आहे. ही कारवाई मनजोत साठी एक जबरदस्त धक्का असून पुढील वर्षभऱ तो एकही रणजी सामना खेळू शकणार नाही. मनजोतने अंडर 16 आणि अंडर 19 सामने खेळताना त्याचे वय खोटे सांगितल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

कालरा हा नुकतंच अंडर 23 च्या टीमसाठी खेळला होता. त्यावेळी त्याचे वय 20 वर्ष 351 दिवस होते. या रणजी सामन्यांमध्ये त्याला शिखर धवनच्या जागी दिल्लीच्या संघात घेतले जाणार होते.