
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी लोकसभा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यांचे पुत्र उन्मेष जोशी यांनी दिल्लीत पार पडलेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला.
अशोक सराफ यांना पद्मश्री
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देखील पद्मश्री सन्मान जाहीर झाला होता. आज राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना तो सन्मान प्रदान करण्यात आला.