आकेरी गावडेवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुडाळमधील आकेरी गावडेवाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश करीत भगवा झेंडा हाती घेतला. या सर्व प्रवेशकर्त्यांना शिवसेनेत मानसन्मान दिला जाईल, तसेच खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी यावेळी दिली.

आकेरी तेलीवाडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जि.प.गटनेते नागेंद्र परब व कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांच्या उपस्थितीत हा शिवसेना पक्षप्रवेश झाला. यावेळी कुडाळ पं.स.चे माजी सदस्य अतुल बंगे, विभाग प्रमुख बबन बोभाटे, सरपंच प्राजक्ता मेस्त्री, शाखा प्रमुख महेश जामदार, उपशाखा प्रमुख सुर्यकांत घाडी, ग्रा.पं.सदस्य शिवलकर, संतोष सातार्डेकर आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी उपसरपंच राजाराम गावडे, प्रमोद घोगळे, संदीप घोगळे, शैलेश गावडे, रूपेश वारंग, किरण वारंग, सिद्धेश गावडे, दिपेश नाईक, बुधाजी नाईक, अनुप शिवलकर, गंगाराम परब, हेमंत गावडे, गौरेश नाईक, अनिल गावडे, नारायण आकेरकर, परशुराम नाईक, मंगेश नाईक, रविंद्र धुमक आदींसह असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेत शिवसेनेत प्रवेश करीत शिवबंधन हाती बांधले. खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गावात झालेल्या विकास कामांवर प्रेरीत होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. जिल्हा प्रमुख संजय पडते, गटनेते नागेंद्र परब व तालुका प्रमुख राजन नाईक यांनी या सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.