मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधी आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिह्यातील आमदार व खासदार मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

कोल्हापूरमधील शासकीय विश्रामगृहावर सकल मराठा समाज व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या आग्रही मागणीसाठी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय झाला तर 4 सप्टेंबरला मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत पुनर्विचार करण्यात येईल. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सध्या कोल्हापूरच्या दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यावर मराठा समाजाला आरक्षण देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, पण राज्य सरकार न्यायालयात टिकणारे आरक्षण कसे देणार हे स्पष्ट करावे अशी मराठा समाजाची मागणी आहे.