
यंदाचा अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात यावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल, असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
अशोक सराफ यांना बालगंधर्व रंगमंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते कीर्ती सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा 2023 चा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. अशोक सराफ यांनी मराठीसह हिंदी रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांना विनोदाचा बादशहा, विनोदवीर म्हटले जाते. समोरच्याच्या चेहऱयावर हास्य फुलविण्याचे, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याचे कठीण कार्य त्यांनी अनेक वर्षे केले, असे मुनगंटीवार म्हणाले.




























































