प्रार्थनाच्या कल्पनेतील रंग कॅनव्हासवर

अभिनेत्री प्रार्थना बेहरे अभिनयाव्यतिरिक्त तिच्यातील कलागुणांमुळे चाहत्यांचे नेहमी लक्ष वेधून घेते. मग गणरायाची इकोप्रेंडली मूर्ती तयार करणे असो किंवा चित्रं काढणे असो. आताही चित्रकलेमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. आपल्या कल्पनेतील रंग कॅनक्हासकर उतरकत तिने सुरेख चित्रे काढली आहेत. माझ्या प्रत्येक चित्रात तुम्हाला माझं अस्तित्क सापडेल, अशी कॅप्शन देत तिने आपली कला सर्कांसमोर आणलीय. आपल्या चित्रकलेविषयी प्रार्थना म्हणते, प्रत्येकासाठी सध्याचा काळ कठीण आहे. त्यामुळे तुम्हाला ज्यातून आनंद मिळेल, अशा गोष्टी करा. तुमची ‘हॅप्पी स्पेस’ शोधायचा प्रयत्न करा. लहानसहान गोष्टीत आनंद

शोधा आणि इतरांना प्रेरणा द्या!

प्रार्थनाने घराच्या भिंतीवरही चित्रे काढली आहेत. तिच्या कलेवर चाहते फारच खूश झाले असून तिला कमेंटच्या माध्यमातून प्रोत्साहित करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या