दर्जा राखत विनोद करणे हे कौशल्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेवणात जशी पुरणपोळी बनविणे खूप अवघड असते तसेच विनोद करणे हेदेखील अवघडच! विनोदाला अनेक पदर असतात. कमरेच्या खालचे विनोद न करता दर्जा राखत भाषेच्या आधारावर विनोद करणे हे कौशल्य आहे. मला विनोदी अभिनेता म्हणून शिक्का बसत असेल तर त्याचा मला 100 टक्के अभिमानच आहे’, अशा भावना अभिनेते, निर्माते प्रशांत दामले यांनी आज व्यक्त केल्या. दामले यांना नुकताच प्रतिष्ठेचा ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ जाहीर झाला आहे. याचेच औचित्य साधत प्रशांत दामले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दामले म्हणाले, ‘मी 40 वर्षे रंगभूमीवर काम करतोय. माझ्या छंदाचे रूपांतर व्यवसायात झाले असल्याने कितीही काम केले तरी थकायला होत नाही. आजवर नाटकांचे 12,793 प्रयोग केले आहेत. अजून खूप रसिकांपर्यंत पोहोचायचे आहे. त्यामुळे हेही आयुष्य कमी पडेल,’ असे वाटते.