Photo – प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, नुकताच पार पडला साखरपुडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुलपाखरू, मन उडू उडू अशा मालिकांमधून समोर आलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा नुकताच तिचा बॉयफ्रेंड प्रतीक शहा सोबत साखरपुडा पार पडला.

त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साखरपुड्याला हृताने फिकट निळ्या रंगाचा गाऊन घातला होता तर प्रतीकने सुट घातलेला.

हृताने काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचा फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबूली दिली होती.