चर्नी रोड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱया मराठी भाषा भवनाचे काम तातडीने सुरू करण्याचे करण्याचे आदेश राज्य सरकारने आज दिले आहे. ऐरोली येथील उपपेंद्राचेही काम लवकरच सुरू होणार आहे.
चर्नी रोड येथील ‘मराठी भाषा भवनाच्या उभारणीचे काम ठप्प’ असे वृत्त मागील मंगळवारच्या दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले होते. राज्य सरकारने या वृत्ताची त्वरित दखल घेऊन चर्नी रोडचे मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन मराठी भाषा भवना उभारणीची घोषणा केली. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत चर्चा करून या मराठी भाषा भवनाच्या उभारणीत उद्योग विभागाने तत्परता दाखवावी असे उदय सामंत यावेळी म्हणाले.
नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या ऐरोली येथील उपपेंद्रासाठी मराठी भाषा विभागाने आवश्यक निधी एमआयडीसीकडे सुपूर्द केला आहे, तर मराठी भाषा भवनसाठी लागणाऱया निधीची तरतूद झालेली आहे तसेच आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ बांधकाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज ऐरोली येथील मराठी भाषा भवन उपपेंद्राच्या जागेची पाहणी केली. तसेच पुढील 15 दिवसांत काम सुरू करण्याची सूचना केली.
– मराठी भाषा भवन मुख्य पेंद्र हे चर्नी रोडच्या जवाहर बाल भवन येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता उर्वरित रिकाम्या भूखंडावर उभे राहणार आहे, तर उपकेंद्र ऐरोली नवी मुंबई येथे बांधण्यात येणार आहे. मराठी भाषा भवन व मराठी भाषा उपपेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे.