वास घ्या, लाखो कमवा; अमेरिकन कंपनीची जाहिरात व्हायरल

2609

आता ठरविक नोकऱ्याच करणार असं म्हणण्याचे दिवस राहिले नाहीत. नवनवीन क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारची कामं करून लोक आपला ठसा उमटवतात. जसं की स्कूबा डाइविंग करता करता पिझ्झा डिलिव्हर करणं, कुत्र्याची पारख करणारं तंत्र हाताळणं, तर काही औषधे बनवण्यासाठी सापापासून मिळणारे विष जमा करणं अशा काही नोकऱ्या सध्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती एका विचित्र नोकरीची. अमेरिकेत आता एक कंपनी अशीच एक नवीन नोकरी समोर आणत आहे. विशेष म्हणजे या नोकरीसाठी तब्बल 36 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 25,88,517 रुपये मिळणार आहेत.

अमेरिकेत AmericanMarijuana.org या एका वेबसाईटने एका अजबगजब नवीन नोकरीची माहिती दिली आहे. त्या कामात गांजाचा वास घेऊन त्याचा दर्जा ओळखणे आणि यासाठी तब्बल दरमहा 2 लाख रुपयांहून अधिक पगार देण्यात येणार आहे. ही कंपनी सध्या गांजाबद्दल माहिती असणाऱ्या अशाच काही लोकांच्या शोधात आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार या कामासाठी त्यांनी आधी ड्रग विक्रेता असलेला आणि सध्या सेलिब्रिटी रॅपर अशी ओळख असलेल्या स्नूप डॉग याच्याशी देखील संपर्क साधला होता.

या कंपनीचे संस्थापक ड्विथ ब्लेक यांचे म्हणणे आहे की, ‘नवीन प्रकारचा गांजा बाजारात आणण्यासाठी आधी तो तपासावा लागेल. त्यावरून गांजाचा दर्जा ठरवण्यात येईल. या कामासाठी कंपनी दरमहा 2 लाख रुपयांपेक्षा अधिक पगार आणि गिफ्ट देणार आहे’.

पण या नोकरीसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्या अटी म्हणजे या नोकरीसाठी वयाची 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. ती व्यक्ती कॅनडा किंवा अमेरिकाची रहिवासी पाहिजे. या देशांमध्ये गांजाचे व्यसन करणे कायदेशीर आसल्याने अशी घालण्यात आली आहे. शिवाय या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास अर्जामध्ये आपल्या बद्दलची थोडक्यात माहिती आणि गांजाबद्दल तुम्ही इतके पॅशनेट का आहात हे देखील लिहून पाठवावे लागणार आहे. शिवाय गांजावर आधारित एखादा 60 सेकंदाचा व्हिडीओ आणि 6 गांजांची नावं याचा त्यामध्ये समावेश असला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या