हिंदू असल्याचे सांगत केला विवाह; खरी ओळख उघड झाल्यावर केली 25 लाखांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

दिल्लीजवळील नोएडातील गौतम नगरमध्ये एका तरुणाने हिंदू असल्याचे सांगत एका हिंदू मुलीशी विवाह केला. त्यानंतर तो तरुण हिंदू नसून मुस्लीम असल्याचे उघड झाले. आपली खरी ओळख मुलीला आणि तिच्या कुटुबीयांना समजल्यावर त्याने मुलीपासून वेगळे होण्यासाठी 25 लाखांची मागणी केली. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नोयडामध्ये एका मुस्लीम तरुणाने हिंदू असल्याचे सांगत एका हिंदू तरुणीशी विवाह केला. साहिल सिंह असे नाव सांगत त्याने तरुणीशी ओळख केली. तिच्याशी त्याने मैत्री वाढवली आणि नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने मुलीच्या कटुंबीयांचाही विश्वास संपादन केला. साहिल खान असलेल्या या तरुणाने साहिल सिंह अशी ओळख दाखवत तरुणीशी विवाह केला. साहिल सिंह नावाची बनावट कागदपत्रेही त्याने मुलीच्या कटुंबीयांना दाखवली होती.

त्यानंतर काही दिवसांनी त्या तरुणाबाबतची खरी माहिती मुलीच्या कटुंबीयांना मिळाली. हा तरुण हिंदू नसून मुस्लीम असल्याचे तिच्या कटुंबीयांना समजले. त्यांनी तरुणाला याबाबत जाब विचारत फसवणूक का केली अशी विचारणा केली. आता तुम्हाला माझी खरी ओळख समजली आहे, तर तुमच्या मुलीपासून वेगळे होण्यासाठी मला 25 रुपये द्या. मला 25 लाख रुपये दिले नाही, तर तुमच्या मुलीपासून वेगळे होणार नाही आणि तिला सोडणार नाही, असे त्याने सांगितले.

साहिल खानच्या त्रासाला कंटाळून तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. तरुणीच्या कटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे समजताच साहिल खानने पळ काढला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तपास पूर्ण झाल्यावर हे नेमके काय प्रकरण आहे, ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.