मार्स पेटकेअरचे विस्‍तारीकरण, 500 कोटी रूपये गुंतवणुकीसाठी करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mars Petcare Factory Expansion MOU Signing

देशातील आघाडीची पेट फूड कंपनी मार्स पेटकेअर इंडियाने त्‍यांच्‍या हैदराबादमधील पेट फूड कारखान्‍याच्‍या विस्‍तारीकरणासाठी गुरूवारी तेलंगणा सरकारसोबत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली. मार्स पेटवेकअर उत्‍पादित केल्‍या जाणाऱ्या पेट फूडच्‍या वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी आणि आशियाभरातील निर्यातींना चालना देण्‍यासाठी हिंदुस्थानमध्‍ये 500 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीला 16 डिसेंबर 2021 रोजी तेलंगणाचे नगरपालिका प्रशासन व नगरविकास मंत्री केटी रामा राव यांच्‍याकडून मान्‍यता मिळाली.

ब्राऊनफिल्‍ड गुंतवणूक दुसऱ्या ड्राय एक्‍सट्रूडर लाइनची भर करत प्‍लांटच्‍या क्षमतेमध्‍ये वाढ करेल. तसेच पॅकेजिंग लाइन क्षमतेची वाढ, युटिलिटी सिस्टिम अद्ययावत आणि उपयोजनांमधील आवश्‍यक विस्‍तारासोबत विकासाला पाठिंबा देण्‍यासाठी मोकळी जागा अशा सुविधा देखील देईल. यामुळे हिंदुस्थानसोबत आशियामधील ड्राय पेट फूडसाठी मागणीची पूर्तता करण्‍यासाठी क्षमतेमध्‍ये जवळपास 65 केटीने वाढ होईल. परिणामत: राज्य, देश, मार्स पेटकेअर आणि अपवादात्‍मकरित्‍या विकसित होत असलेल्‍या विभागाच्‍या विकासाला मदत होईल.

ही गुंतवणूक स्‍थानिक समुदायाच्‍या विकासामध्‍ये, तसेच अधिक रोजगार निर्मिती आणि स्‍थानिक मनुष्‍यबळाचे अपस्किल करण्‍यामध्‍ये लक्षणीय योगदानकर्ता ठरेल. कंपनी विविध पदांसाठी 180 ते 200 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करेल आणि त्‍यांना सखोल माहिती व प्रशिक्षण देईल. लैंगिक विविधतेवरील लक्ष कायम राखत यामधून महिलांना देखील अधिक रोजगार मिळण्‍याची खात्री मिळेल, ज्‍यामुळे समाजाचे सक्षमीकरण होण्‍यासोबत प्‍लांटमधील समुदायांच्‍या एकूण स्‍वास्‍थ्‍यामध्‍ये सुधारणा होईल. मार्स पेटवकेअर सिद्दीपेट जिल्‍ह्यातील गावांच्‍या कल्‍याणाप्रती योगदान देणे सुरूच ठेवेल.

याव्‍यतिरिक्‍त या गुंतवणूकीमुळे स्‍थानिक व्‍यवसाय विकसित होण्‍यास मदत होईल, जेथून कच्‍च्या मालांचा स्रोत उपलब्‍ध होईल. हा प्रकल्‍प सर्व संबंधित मार्स जागतिक मानके व स्‍थानिक नियामक आवश्‍यकता म्‍हणजेच रचना व क्‍यूअॅण्‍डएफएस मानकांशी प्रमाणित आहे ही बाब लक्षात घेत प्रदात्यांच्‍या क्षमतांचे अपग्रेडेशन होण्‍यासोबत क्षमता निर्मितीला पाठिंबा देखील देण्‍यात येईल.

मार्स पेटकेअरचे व्‍यवस्‍थापकीय संचालक गणेश रमाणी म्‍हणाले, ”आम्‍ही 2008 मध्‍ये हैदराबाद येथे आमचे पहिले उत्‍पादन प्‍लांट सुरू केले. पाळीव प्राण्‍यांचे पालक व ग्राहकांना उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या पेट फूडबाबत माहिती देण्‍याच्‍या आमच्‍या सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नांमुळे उद्योगात 2019 मध्‍ये 16 टक्‍के, तर 2020 मध्‍ये 20 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आहे. मार्स पेटकेअरने दोन्‍ही वर्षांमध्‍ये पेट फूड बाजारपेठेत प्रबळ अग्रणी स्‍थान राखले. 2021 मध्‍ये आमच्‍या बाजारपेठ हिश्शात वाढ झाली आणि विभागीय विकासाला गती दिली, जे 35 टक्‍के ते 40 टक्‍के असण्‍याची अपेक्षा आहे. या विस्‍तारीकरणामुळे आम्‍हाला भारताच्‍या वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यामध्‍ये आणि स्‍थानिक लोकांसाठी अनेक रोजगार निर्माण करण्‍यामध्‍ये मदत होईल. आम्‍हाला विश्‍वास आहे की, यामुळे भविष्‍यात अत्‍यंत यशस्‍वी विस्‍तारीकरणाला चालना मिळेल. त्‍यांच्‍या पाठिंब्‍यामुळेच आम्‍हाला ब्राऊनफिल्‍ड गुंतवणूक करण्‍यास प्रेरणा मिळाली आहे. आम्‍हाला त्‍वरित मान्‍यता व लक्षणीय इन्‍सेटिव्‍ह्ज देण्‍यासाठी मी आपले मन:पूर्वक आभार मानतो.”