नेमबाजाने बॉक्सिंगमध्ये नाक खुपसू नये! मेरी कोमचा अभिनव बिंद्राला ‘पंच’

750

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने मेरी कोम आणि निकहत जरीन यांच्यात पात्रता लढत व्हायला  हवी या जरीनच्या मागणीला गुरुवारी समर्थन दिले. मात्र  हिंदुस्थानची स्टार बॉक्सर असलेल्या मेरी कोमला बिंद्राने जरीनला दिलेले हे समर्थन चांगलेच झोंबले. खवळलेल्या मेरी कोमने ‘नेमबाजाने बॉक्सिंगमध्ये नाक खुपसू नये’ अशा शब्दांत बिंद्राला पंच लगावला.

सहा वेळची जगज्जेती मेरी कोम म्हणाली, अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता असला तरी मीदेखील जागतिक स्पर्धेत अनेक सुवर्णपदके जिंकलेली आहेत. बिंद्राने बॉक्सिंग खेळाबद्दल आपले मत व्यक्त करण्याची काहीच गरज नव्हती. मी कधीच नेमबाजीबद्दल चर्चा करत नाही. त्यामुळे बॉक्सिंगच्या नियमामधील काही कळत नसलेल्या बिंद्राने गप्प राहिलेलेचं बरं, अशा शब्दांत मेरी कोमने बिंद्राला सुनावले.

मी ट्रायलला घाबरत नाही!

मला ऑलिम्पिक संघात स्थान देण्याचा निर्णय हिंदुस्थानी बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) घेतला आहे. माझी ट्रायल घेऊ नका असे मी ‘बीएफआय’ला सांगितलेले नाही.त्यामुळे मी ट्रायल लढतीला घाबरत नाही, असा दमदार ठोसा मेरी कोमने लगावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या