मुंबईतील 19 पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली, मॅटने घेतली गंभीर दखल; पोलीस आस्थापना मंडळाकडून मागवला खुलासा

मुंबईतील 19 पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) पोलीस आस्थापना मंडळाकडून याचा खुलासा मागवत 3 जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली.

पोलीस मंडळाने 17 मे 2025 रोजी हे बदली आदेश जारी केले. यात समतानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल पाटील यांची मरोळ सशस्त्र दलात बदली केली होती. याविरोधात त्यांनी अॅड. प्रशांत नागरगोजे यांच्यामार्फत मॅटमध्ये याचिका दाखल केली. मॅट सदस्य देबाशीष चक्रवर्ती यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. तेव्हा या बदल्या करताना नियमांचे पालन झालेले नाही असे तूर्त स्पष्ट होते, असे निरीक्षण चक्रवर्ती यांनी नोंदवले.
निवडणुकीसाठी बदल्या

आगामी महापालिका निवडणुकीसाठी या बदल्या करण्यात आल्या आहेत. आपल्या मर्जीतील अधिकाऱयांची वर्णी लावण्यासाठी बदलीचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप अॅड. नागरगोजे यांनी केला.