
अखिल भारतीय मातंग समाज संघाच्या (बी गट)वतीने मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. बी. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील गटाने या आधीही पालिका आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे.
संघाच्या वतीने या आधीही घाटकोपर, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्गसह अनेक ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेनेच्या पाठीशी मातंग समाजाने उभे राहण्याचे आवाहन केले. आताही विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मर्हीराष्ट्राच्या जनतेचे आणि शिवसैनिकांचे स्वप्न साकार करण्यासाठी मातंग समाज शिवसेनेच्या पाठीशी आहे, असे आश्वासन बी. जी. गायकवाड यांच्या वतीने देण्यात आले आहे.




























































