
महागाईत आणखी दरवाढीची ‘काडी’ पडली आहे. काडीपेटय़ांच्या किमतीत एक रुपयांनी वाढ झाली आहे. तब्बल 14 वर्षांनंतर ही दरवाढ झाली आहे. 1 डिसेंबरपासून एक रुपयाने काडीपेटी महाग होणार आहे. 2007 मध्ये काडीपेटय़ांच्या दरात 50 पैशांनी वाढ करण्यात आली होती. ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेस्च्या बैठकीत 1 रुपयाने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. लाल फॉस्फरस, मेण, बॉक्स बोर्ड या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ तसेच डिझेल दरवाढीमुळे महाग झालेली वाहतूक यामुळे काडीपेटय़ांची दरवाढ केली आहे.


























































