सात वर्षांच्या मुलीवर मौलवीचा बलात्कार, पोलिसांचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये उन्नावमध्ये एक भयंकर घटना उघड झाली आहे. एका मौलवीने सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यानंतर पोलिसांनी बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला काही तास बसवून ठेवल्याचा संतापजनक प्रकारही घडला आहे.

बुधवारी कानपूर-उन्नाव सीमेवरील गंगाघाट पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या जाजमऊ पोलीस चौकीत ही घटना केली आहे. येथील परिसरात चालणाऱ्या एका मदरशात अब्दुल रहीमने तिथे शिकणाऱ्या एका सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना ही गोष्ट सांगितली.

या कथनाने हादरलेल्या मुलीच्या घरच्यांनी मदरसा गाठली. त्यांना पाहून मौलवी तिथून फरार झाला. मग पीडितेच्या कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठलं. पण, तिथे पोलिसांनी तिला वैद्यकीय चाचणीसाठी न पाठवता तिथेच अनेक तास बसवून ठेवलं. सुमारे पाच तास पीडितेचं कुटुंब पोलीस स्थानकातच होतं.

तिथे मुलीला वारंवार विचारणा होत होती. पण, त्यापैकी कुणीही वैद्यकीय चाचणीसाठी तिला नेलं नाही. अखेर एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी तिथे धाव घेतली तेव्हा त्यांच्या भीतीने पोलिसांनी तिला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवलं.