मे… मनोरंजनाचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे सध्या थिएटर बंद असली तरी मनोरंजन मात्र थांबलेले नाही. मे महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे. मराठीसह बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार आहे.

फोटो प्रेम

नीना कुलकर्णी यांचा ‘फोटो प्रेम’ अमेझॉन प्राईमवर 7 मे रोजी रिलीज होईल. आपल्या ‘जुन्या फोटो’मध्ये आपण तितकेसे छान दिसत नसल्यामुळे आपल्या मृत्यूनंतर सर्वांना आपला विसर पडेल याची माईला चिंता असते. माईची कॅमेऱयाची भीती घालविण्याचा आणि भीतीवर मात करून परफेक्ट फोटो काढण्यापर्यंतचा प्रवास यात दाखवला आहे.

राधे

‘वाँटेड’नंतर प्रभुदेवा आणि सलमान खानची जोडी ‘राधे’निमित्ताने एकत्र आली आहे. यात सलमान पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत आहे. ईदला म्हणजेच 13 मे रोजी ओटीटी आणि थिएटरमध्ये एकाच वेळी ‘राधे’ प्रदर्शित होणार आहे. झी फाइव्हसह टाटा स्काय, एअरटेल डिजिटलवर हा चित्रपट पे पर व्यू तत्त्वावर पाहता येईल.

सरदार का ग्रँडसन

अर्जुन कपूर आणि रकुलप्रीत सिंगचा कॉमेडी ड्रामा असलेला सरदार का ग्रॅंडसन हा 18 मे रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रिमिंग होणार आहे. नीना गुप्ता, जॉन अब्राहम, अदिती राव-हैदरी यांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

माईलस्टोन

लक्षवीर सरन आणि सुविंदर विक्की यांचा ‘माईलस्टोन’ चित्रपट 7 मे रोजी नेटफ्लिक्सवर भेटीला येणार आहे. लहान मुलांमुळे नोकरी गमवावी लागलेल्या एका ट्रक ड्रायव्हरभोवती चित्रपटाची कथा फिरते.

वंडर वुमन 1984

गेल गॅडटची मुख्य भूमिका असलेला हा हॉलिवूडपट गतवर्षी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता हा चित्रपट 15 मे रोजी अमेझॉन प्राईमवर घरबसल्या पाहता येईल.