
शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेना आणि थाय बॉक्सिंग मुंबई उपनगर या संस्थांच्या वतीने येत्या रविवारी 14 नोव्हेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत चेंबूर कलेक्टर कॉलनी,बीएमसी शाळा येथे महापौर चषक थाय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईतील थायबॉक्सिंगपटुंना आपले कौशल्य या स्पर्धेत दाखवता येणार आहे. स्पर्धेच्या संयोजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे. या महापौर चषक 2021-22 थाय बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईतील थाय बॉक्सिंगपटूंनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसामर्थ्य सेना सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ आणि अध्यक्ष संदीप भोज यांनी केले आहे.संपका&साठी मोबाईल ः9920937387 ,9137000533 आणि 8691872864





























































