Photo – साडी आणि मोत्यांनी नटली, अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या अभिनयानं आणि गोड हसण्यानं प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख . झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील ‘मानसी’ या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. याशिवाय तिने हिंदी मालिका ‘इमली’ मध्ये ‘मालिनी’ ची भूमिका साकारून राष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळवली. नुकतीच ती चर्चेत आली ते तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमुळे. तिने डिझायनर फ्लोरल एम्ब्रॉयडरी असलेली ऑर्गेंझा साडीतील ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती सुंदर दिसत आहे. सोबत मॅचिंग पफ-स्लीव्हज असलेला फ्रिल डिझाईनचा ब्लाउज घातला आहे, ज्यामुळे या लुकला एक विंटेज आणि क्लासिक टच मिळाला आहे. त्यासोबत तिने गळ्यात मोत्यांची बारीक माळ, हातात मोत्यांचे नक्षीदार कडे आणि कानात सुंदर मोत्याचे ड्रॉप इअररिंग्स घातले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.