
एमबीबीएसच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा 10 जूनलाच घेण्यात येतील असे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा ऑनलाइन घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी आणि विविध संघटनांनी केली होती. ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबतची याचिका उच्च न्यायालयानेही फेटाळून लावल्याने परीक्षा ऑफलाइन घेतल्या जातील असे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.




























































