संभाजीनगरमध्ये महास्वच्छता अभियान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

संभाजीनगरमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि संभाजीनगर महापालिकेतर्फे रविवारी एकाच वेळी सकाळी 7 वाजेपासून शहरात तीन ठिकाणी महास्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. क्रांती चौकातून या अभियानाची सुरुवात झाली. या स्वच्छता अभियानामध्ये राज्याच्या सात जिल्ह्यातून संभाजीनगरमध्ये प्रतिष्ठानचे 30,000 सदस्य जमा झाले आहेत.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि संभाजीनगर महापालिकेतर्फे रविवारी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यातल्या सात जिल्ह्यातून जवळपास तीस हजार सदस्य या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आले आहेत. क्रांती चौकातून या अभियानाला सुरुवात झाली आहे. शहरातील 33 मार्गावर हे महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. नगर, नाशिक, कोल्हापूर, रावेर, मुक्ताईनगर अशा सात जिल्ह्यातून संभाजीनगरमध्ये हजारो सदस्य दाखल झाले आहेत. एवढेच नव्हे तर विद्यापीठ गेट परिसर, घाटी रुग्णालय, जिल्हा परिषद मैदान या भागात त्यांनी स्वच्छतेला सुरुवात केली आहे. क्रांती चौकात खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर गजानन बारवाल यांच्या उपस्थितीत अभियानाची सुरुवात करण्यात आली.