
मध्य रेल्वेच्या मेन लाईनसह हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक असेल. तसेच हार्बर लाइनवर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ट्रान्सहार्बरवर पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 पर्यंत ठाण्याला जाणारी आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेल येथे जाणाऱया डाऊन मार्गावरील सेवा रद्द असेल.