शिवसेना खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांचा निर्णय, 3 दिवस मेहकरात जनता कर्फ्यु

655

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी मेहकर शहरातील व्यापारी असोसिएशनने आज शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत मेहकर शहरात दिनांक १० जुलै शुक्रवार पासून १२ जुलै रविवार पर्यंत ३ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.

या सबंधीची व्यापारी असो, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची एक बैठक स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉल मध्ये आज पार पडली या बैठकीस जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड़, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप तड़वी, ठाणेदार आत्माराम प्रधान, नगर परिषद मुख्याधिकारी सचिन गाड़े  उपस्थित होते. सदर बैठकीत किराणा असो, कृषी केंद्र संचालक असो, सराफा असो, कपड़ा व्यापारी असो, मेडिकल असो, तसेच छोटे व्यापारी असो चे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर सावधानता बाळगण्यासाठी व मेहकर शहरात कोरोना ची संसर्ग चैन तोडण्यासाठी सर्वसहमति ने ३ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेऊन कडकडित जनता कर्फ्यू ठेवण्याचे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.

या आवाहनाला उपस्थित सर्व व्यापारी बांधवांनी प्रतिसाद देत शहर कोरोना मुक्त करण्यासाठी ३ दिवस म्हणजेच १०,११,१२ जुलै रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे मान्य केले .या जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रतिष्ठानें उघडल्यास त्यांचेवर कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या