मेहबुबा मुफ्तींना दहशतवादी वाणीचा पुळका, वाचा काय म्हणाल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

हिझबूल मुजाहिदीनचा चकमकीत मारला गेलेला उच्चशिक्षित मन्नार वाणी हा कश्मीर खोऱयात प्रदीर्घ काळ चाललेल्या निर्दयी हिंसेचा बळी ठरला आहे, अशी सहानुभूती व्यक्त करीत जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी अलिगड मुस्लीम विद्यापीठाने मन्नारसाठी प्रार्थना सभा घेणाऱया विद्यार्थ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी केली.

अलिगड मुस्लीम विद्यापीठातील पीएचडीचे शिक्षण सोडून हिझबूल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या मन्नार वाणीला 11 ऑक्टोबरला सुरक्षा दलाने चकमकीत ठार केले होते. त्यानंतर आपला माजी सहकारी मन्नार याच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित करणाऱया एएमयूच्या तीन विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निलंबित केले होते. 12 ऑक्टोबरला विद्यापीठ कॅम्पमध्ये हिंदुस्थानविरोधी नारे दिल्याचा आरोप या विद्यार्थ्यांवर आहे. त्यांच्यावरील कारवाई मागे घ्या अन्यथा आम्ही विद्यापीठ सोडून जाऊ, अशी धमकी 1200 कश्मिरी विद्यार्थ्यांनी पत्र लिहून एएमयूला दिली होती.

मन्नार वाणी कश्मीरातील हिंसक परिस्थितीचा बळी ठरला आहे. त्याच्या स्मृतीसाठी विद्यार्थ्यांना दंडित करणे योग्य ठरणार नाही या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि एएमयूला कश्मिरी विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्यास भाग पाडावे.

– मेहबुबा मुफ्ती