
पूर्ववैमन्यसातून एका तरुणावर गोळीबार करून यूपीला पळून गेलेल्या मेहताब अली मोसम अली खान (35) याला निर्मलनगर पोलिसांनी शोधून पकडून आणला.
गेल्या आठवडय़ात खेरवाडी येथे एका तरुणाच्या पाठीवर गोळी झाडण्यात आली होती. गोळीबार केल्यानंतर आरोपीने पळ काढला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपीचा शोध सुरू केला होता. आरोपी मेहताब अली मोसम अली खान हा यूपीत जाऊन लपला असल्याची पक्की माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी यूपीत जाऊन मेहताबला बेडय़ा ठोकल्या. निर्मलनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.




























































