
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी मेहुल चोक्सी एटिंग्वा-बारबुडा येथून गायब झाला आहे. मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितले आहे की, मला चोक्सीच्या परिवाराने भेटण्यासाठी बोलावले होते. चोक्सी गायब झाला असून कुटुंबीय चिंतेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Fugitive diamantaire Mehul Choksi has gone missing. His family members are worried & anxious, and they had called me to discuss. Antigua Police is investigating: Choksi’s lawyer, advocate Vijay Aggarwal to ANI
(File photo) pic.twitter.com/TKEnGCBqt0
— ANI (@ANI) May 24, 2021
मेहुल चोक्सी देशात लपून बसला होता त्या एटिंग्वा-बारबुडाच्या पंतप्रधानांनी त्याचे नागरिकत्व रद्द करून त्याला हिंदुस्थानच्या हवाली करणार असल्याचे सांगितले होते.
पंतप्रधान गॅस्तन ब्राऊन यांनी याची माहिती दिली होती. ते म्हणाले ‘आम्ही कोणत्याही गुन्हेगाराला आमच्या देशात आश्रय देणार नाही. हिंदुस्थान आणि आमच्यात झालेल्या कराराचे पालन करत आहोत. चोक्सीची चौकशी सुरू आहे. चौकशी संपल्यावर त्याला हिंदुस्थानच्या हवाली करण्यात येईल.’ पीएनबी घोटाळय़ानंतर मेहुल चोक्सी एटिंग्वात पळला आणि नागरिकत्व घेतले. एटिंग्वातील न्यायालयात जुलै महिन्यात चोक्सीबाबत सुनावणी होणार होती.




























































