मेळघाटात नकली व बनावट दारू बनवणाऱ्या टोळीला अटक

मेळघाटात व मेळघाटातील ग्रामीण भागात नकली व बनावटी दारू बनवून गावोगावी पोहोचवणाऱ्या बदमाशांच्या टोळीला पोलिसांनी शुक्रवारी चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह गावातील जय महाकाली मुलींचे शासकीय वस्तीगृह येथून अटक केली. येथून दहा आरोपीसह 17 लाख 60 हजार 340 लाख रुपये चामाल पोलिसांनी जप्त केला आहे.

चिखलदरा तालुक्यात पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखेतील पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, काही लोक सेमाडोह येथे नकली देशी व विदेशी दारू तयार करीत आहे. गोपनीय माहिती वरून गुन्हे शाखेत व पोलिसांची टीम सेमाडोह येथे गेली व मिळालेल्या माहिती नुसार सेमाडोह येथे असलेल्या जय महाकाली मुलींचे वस्तीगृह सेमाडोह येथे धाड टाकली. याठिकाणी काही लोक हे बनावटी देशी-विदेशी दारू तयार करीत असल्याचे रंगेहात पकडळण्यात आले असून त्यांच्यासोबत बनावट दारू तयार करण्याचा साहित्य मोठ्या प्रमाणात होता. या वसतिगृहाचे गुन्हे शाखेने व चिखलदरा पोलिसांनी बारकाईने पाहणी केली असता बनावट दारु बॉटलिंग करण्याकरिता प्रत्येकी दोनशे लिटर समतेचे प्लास्टिकचे ड्रम मध्ये 1000 लिटर अल्कोहोल, एका स्टील कोटींमध्ये वीस लिटर पाणी मिश्रित अल्कोहलसह एकूण 17 लाख 68 हजार 340 रूपये मुद्देमाल जप्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या