
मेट्रोच्या इतर प्रकल्पांसाठीही हजारो झाडांचे बळी दिले जाणार आहेत. मेट्रो-2 ए आणि मेट्रो-2 बी या प्रकल्पांसाठी 1552 झाडे तोडली जाणार आहेत अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) माहिती अधिकाराखाली दिली आहे. इतकी झाडे तोडली गेली तरी 2022 झाडांचे प्रत्यारोपणही केले जाणार आहे असा दावाही एमएमआरडीएने केला आहे.
मेट्रो-2 ए साठी 749 झाडे तोडली जाणार असून 781 झाडे प्रत्यारोपित केली जाणार आहेत. मेट्रो-2 बी साठी 803 झाडे तोडली जाणार असून 1241 प्रत्यारोपित केली जाणार आहेत.
– दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो 2020 च्या अखेरीस ट्रकवर येईल तर डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो 2021 डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा एमएमआरडीएचा विचार असल्याचे अधिकारी सांगतात.
– स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो-6 प्रकल्पासाठी महाकाली, सीप्झ, साकी विहार, रामबाग आणि पवई तलाव परिसरातील 304 झाडे तोडली जाणार आहेत तर मेट्रो-4 साठी भक्ती पार्क, वडाळा, घाटकोपर, अमर महल, कुर्ला, भांडुप एल. बी. एस. मार्ग आणि मुलुंड चेकनाका येथील 1510 झाडे तोडली जाणार आहेत.





























































