
एमएमआरडीएला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मेट्रो 2बी (अंधेरी ते मानखुर्द)च्या प्रकल्पाआड येणारी वांद्रे येथील 86 कांदळवन तोडण्यास न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने परवानगी दिली आहे. 86 झाडांच्या बदल्यात 4 हजार 400 झाडे लावण्याचे एमएमआरडीएने हमी दिली असून हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा असल्याचे लक्षात घेत खंडपीठाने झाडे तोडण्यास परवानगी दिली.
डी एन नगर (अंधेरी) ते मंडाले (मानखुर्द) मेट्रो 2 बी हा 23.64 किमी लांबीचा एलिव्हेटेड प्रकल्प असून या प्रकल्पात 22 मेट्रो स्थानके उभारली जाणार आहेत. परिगाची खाडी येथे एमएमआरसीएलला सहा पिलर्स उभारायचे आहेत. त्यासाठी 86 कांदळवनांचा अडथळा होत आहे. ही कांदळवन तोडण्याची परवानगी मिळावी यासाठी एमएमआरडीएने हायकोर्टात अर्ज केला होता. त्यावर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. राज्याच्या पर्यावरण विभागाने नोव्हेंबर 2018 साली तर जानेवारीमध्ये केंद्र सरकारने झाडे तोडण्यास परवानगी दिल्याची बाब लक्षात घेता हायकोर्टाने झाडे तोडण्यास पवाकानगी दिली.
एमएमआरडीएचे म्हणणे काय
मेट्रो प्रशासनाने युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की या प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडली जाणार आहेत. यामुळे प्रवासाच्या केळेत 40 ते 55 मिनिटांची बचत होणार असून 35 टक्के ट्रफिकची समस्याही निकाली निघणार आहे याशिवाय इंधन बचत होणार असून प्रदूषणातही मोठय़ा प्रमाणात घट होणार आहे.


























































