
मेक्सिकोच्या सेंट्रल स्टेट गुआनाजुआतो येथे एका बारमध्ये झालेल्या गोळीबारात दहा लोकांची हत्या करण्यात आली आहे. तर या हल्ल्यात पाचजण जखमी झाले आहेत.
स्थानिक अधिकाऱ्यांनी हल्ल्याची रविवारी माहिती दिली. मेक्सिकोच्या सेंट्रल स्टेट गुआनाजुआतोमध्ये स्थानिक वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी 5 वाजता हा हल्ला एल एस्टाडियो बारमध्ये झाला आहे. काही सशस्त्र लोकांनी हल्ला केला होता. एल एस्टाडियो बार सेलाया आणि क्वेरेटारो शहराला जोडणाऱ्या एका रस्त्यावर आहे. येथे हल्लेखोरांनी कर्मचाऱ्यांसह ग्राहकांवर अंदाधुंद गोळीबार केला. याप्रकरणी स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात सात पुरुष आणि तीन महिलांचा मृत्यू झाला आहे.
मेक्सिकोतील गुआनाजुआतो एक समृद्ध औद्योगिक क्षेत्र आहे. मेक्सिकोच्या लोकप्रिय पर्यंटन स्थळांपैकी एक आहे, मात्र अलिकडे ते देशातले सगळ्यात गुन्हेगारी वृत्ती वाढलेले राज्य बनले आहे. मेक्सिकोच्या सेंट्रल स्टेट गुआनाजुआतोमध्ये सांता रोजा डे लीमा आणि जलिस्को नुएवा जेनरेशन नावाचे दोन तस्कर आहेत. हे दोन्ही तस्कर राज्यात घातक गुन्हे करत आहेत. ही लोकं अवैध कामे करत ज्यामध्ये ड्रग्स, इंधनचोरीसाठी ओळखले जातात. नुकताच जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरात एका चर्चवर हल्ला झाला होता.



























































