‘म्हाडा’च्या माध्यमातून कामाठीपुराचा समूह पुनर्विकास करणार – गृहनिर्माण मंत्री

295

‘म्हाडा’च्या माध्यमातून कामाठीपुराचा समूह पुनर्विकास केला जाईल. लवकरच कामाठीपुराचा विकास आराखडा तयार करण्यात येईल अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

मुंबईतील कामाठीपुरा भागाच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने कामाठीपुरा येथे  मंत्री श्री.आव्हाड यांनी प्रत्यक्ष भेट देवून प्रकल्पाची स्थळ पाहणी केली व स्थानिक रहिवाशांशी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या जाहीरसभेत ते बोलत होते.

मंत्री आव्हाड म्हणालेआम्ही कामाठीपुरामध्ये एक सकारात्मक भूमिका घेऊन आलो आहोत. कामाठीपुरा हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेले असून त्यालगतच ताडदेव, मुंबई सेंट्रलभायखळाजेजे हॉस्पिटल, ग्रँट रोड स्टेशन यासारखे महत्त्वाचे भाग आहेत. कामाठीपुराचा विकास करून तेथे सर्वात मोठे व्यापारी केंद्र उभे करता येईल. यापुढे ‘म्हाडा’चे जे मोठमोठे प्रकल्प आराखडे राहतील, त्यामध्ये म्हाडाची संयुक्त भागीदारी असेल. म्हाडाने सर्व जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. ‘म्हाडा’च्या एका घरासाठी आज दोनशे लोक अर्ज करतात तर दुसरीकडे विकासकाला त्याचे एक घर विकण्यासाठी अनेकांकडे जावे लागत आहे. यावरून लोकांचा म्हाडा व आणि शासनावरील विश्वास दिसून येतोकामाठीपुराचा विकास करताना येथील स्थानिक लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे. कुठलीही भीती बाळगू नका, विश्वास बाळगाअसेही श्री आव्हाड यांनी सांगितले.


तत्पूर्वी मंत्री आव्हाड यांनी संपूर्ण कामाठीपुरा परिसराची पाहणी केली. स्थानिक लोकांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक गल्लीमध्ये आणि चाळीमध्ये मंत्री श्री. आव्हाड यांचे फटाके फोडून, पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या