शाओमीचा 108 मेगापिक्सल कॅमेरा फोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाओमी या कंपनीने आपल्या ‘एमआय नोट-10’ हा हॅण्डसेट बाजारात आणायची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये तब्बल 108 मेगापिक्सल कॅमेरा आहे. शाओमीच्या या मोबाईलची स्क्रीन 6.7 इंचाची असून यात स्नॅपड्रहन 855-प्लस हा प्रोसेसर बसवण्यात आला आहे. या मोबाईलचा रॅम 6 जीबी असून इंटर्नल मेमरी 128 जीबी असणार आहे. हा मोबाईल याच महिन्यात म्हणजे 14 नोव्हेंबरला हिंदुस्थानात दाखल होणार असल्याचे शाओमी कंपनीने म्हटले असून तो फटाफट चार्जिंग होणार असल्याचेही कंपनीने आज जाहीर केले आहे. शाओमीच्या या हॅण्डसेटमध्ये पाच कॅमेरे देण्यात येणार असून 108 मेगापिक्सल असलेला कॅमेरा देणारा ‘एमआय नोट-10’ हा जगातील पहिलाच दमदार हॅण्डसेट ठरेल अशी शक्यता आहे. आपल्या ‘एमआय सीसी9-प्रो’च्या आगमनानंतर शाओमी कंपनीने ‘नोट-10’ बाजारात आणायचे ठरवले आहे. थायलंड आणि रशिया येथे शाओमीच्या ‘सीसी9-प्रो’ हॅण्डसेटला मान्यता मिळाली आहे.