कांगडातील मिग-२१ विमान दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | हिमाचल प्रदेश 

हिमाचल प्रदेशातल्या कांग्रामध्ये हवाईदलाचे मिग- २१ फायटर जेट कोसळले आहे. हिमाचल प्रदेशातल्या कांगडा येथे हे विमान कोसळले असून पठाणकोटहून येत असताना ही दुर्घटना घडली आहे. धरमशाळा पासून ५५ किमी अंतरावरील पाट्टा जाटियन येथे साधारण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका वैमानिकाचा  मृत्यू झाला आहे.