
परप्रांतियांना घराकडे जाण्याची ओढ लागली होती. नगर जिल्ह्यात काही उत्तर प्रदेशचे मजूर अडकले होते. त्यांची रवानगी आज विशेष ट्रेनने उत्तर प्रदेशला करण्यात आली तर रात्री उशिराने मध्यप्रदेश येथे जाणाऱ्या 1100 मजुरांना रेल्वेने सोडण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्याबाबतचे नियोजन केले आहे.
लॉकडाऊन काळामध्ये अनेक मजूर नगर जिल्ह्यामध्ये अडकलेले होते, त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश यासह इतर राज्यातील संख्यासुद्धा जिल्ह्यामध्ये मोठा प्रमाणात आहे. उत्तर प्रदेश येथील राहणाऱ्या लखनऊ येथील तसेच उन्नाव येथील मजुरांचा यामध्ये समावेश असल्यामुळे त्यांना आपल्या घरी सोडण्यासाठी विशेष रेल्वे चे नियोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अडकलेल्या मजुरांची अन्नपाण्याची निवाऱ्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून केली होती. यांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली होती. आज पोलिस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आलेला होता.
एका बोगीमध्ये 54 जणांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एका बाकावर विशिष्ट अंतर सोडून दोन जणांना बसण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी आज या मजुरांना जेवणाचे पाकिटे व अन्य खाण्याचे साहित्य उपलब्ध करून दिले आहेत.

























































