
‘माइंड वॉर्स’ हा झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझेस लि.द्वारा प्रमोट करण्यात येत असलेला एक मल्टी-प्लॅटफॉर्म नॉलेज प्रोग्राम असून त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच वर्षात तब्बल 7000 हून अधिक शाळांनी हा प्रोग्राम स्वीकारला आहे. अशा प्रकारे, सर्वाधिक शाळांपर्यंत पोहोचलेल्या देशातील काही प्रोग्राम पैकी हा एक ठरला आहे. त्या व्यतिरिक्त या प्रोग्राममध्ये लॉकडाउन कालावधीत 1700 शाळांचे विद्यार्थी सामील झाले आहेत. अशा रीतीने, Zee5 आणि सोशलमीडियामध्ये त्याची डिजिटल घोडदौड सुरू आहे.
COVID-19 चा उद्रेकझाल्यापासून लहान मुले व त्यांच्या पालकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी माइंड वॉर्सने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. याप्लॅटफॉर्मवरील क्विझ चॅलेंजचा उद्देश कोरोना उद्रेकाबाबतची जागरूकता वाढवणे हा असून सध्याच्या लॉकडाउन परिस्थितीत झुंजणाऱ्या व्यक्तींना देखील त्याचा फायदा होतो तसेच विद्यार्थ्यांना आपला अभ्यास सुरू ठेवण्याची उभारी देतो. यात अनेकप्रश्नांची मालिका आहे, ज्यातून विद्यार्थी या महामारीबद्दल जाणून घेऊ शकतात, त्यापासूनस्वतःचे रक्षण कसे करावे व त्यासाठी काय तयारी करावी हे समजून घेऊन शकतात. यातूनमाहिती देण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा दुहेरी उद्देश साध्य होत आहे. माइंड वॉर्सने देशातील इयत्ता 4 ते 10 मधीलविद्यार्थ्यांसाठी एक निःशुल्क मासिक अभ्यासक्रम स्पर्धा देखील सुरू केली आहे. ही परीक्षा प्रत्येक वर्गाच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित असते. या महामारीमुळे अनेकसंस्था बंद झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या आत्तापर्यंत शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करण्यास याची मदत होऊ शकते. शिवाय, प्रत्येक यत्तेतील सर्वोत्तम 30 सहभागींना मागाहून बक्षीस देखील मिळणार आहे.
झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझेस लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश के. बन्सलयांनी टिप्पणी केली, “एकउपक्रम म्हणून माइंड वॉर्स आमच्या खूप जवळ आहे, कारण लहान मुलांच्या डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात तो कल्पकतेने काम करत आहे. आम्ही एक वर्ष पूर्ण केले आहे आणि एक मैलाचा दगड पार केल्याचा आणि देशभरातूनउदंड प्रतिसाद मिळाल्याचा आनंद आम्हाला आहे.” अधिक माहितीसाठी: https://www.mindwars.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.




























































