पापड खा, कोरोना पळवा म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांनाच झाली लागण

1241

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी सायंकाळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राजस्थानच्या बिकानेर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आलेले मेघवाल यांच्याकडे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपद आहे.

fb_img_1596907838464

दरम्यान, मेघवाल यांच्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा, उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वतंत्र देव सिंह घरीच क्वारंटाईन असून अन्य नेत्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

व्हिडीओमुळे झाले होते ट्रोल
मोदी सरकारमधील मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी चक्क कोरोनाशी लढा देणारे आणि शरीरात अँटीबॉडीज तयार करणारा एक पापड लाँच केला होता. सोशल मीडियावर या केंद्रीय मंत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यात त्यांनी हा पापड खा आणि कोरोना पळवा असा दावाच केला होता. यामुळे ते ट्रोलही झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या