
नाताळच्या सुट्ट्या आणि वीकएन्ड असल्याने मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे घोटी टोल नाक्यावर आज दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
यावेळी मुंबईहुन नाशिकच्या दिशेने येत असताना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपला ताफा बाजूला थांबवून घोटी टोल नाक्यावर स्वतः उभे राहून सर्व वाहने सोडण्याच्या सूचना केल्या.
यानंतर येथील वाहतूक सुरळीत होईपर्यंत मंत्री छगन भुजबळ हे घोटी टोल नाका येथे थांबून त्यांनी प्रवाशांना दिलासा दिला. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

































































