मंत्री बंगल्यात… रामटेक पंकजांना, रॉयलस्टोन विखेंना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता मंत्र्यांना शासकीय निवासस्थान आणि दालन वाटप केले आहे. यापूर्वीच्या अनेक मंत्र्यांना ‘नकोसा’ झालेला रामटेक बंगला पंकजा मुंडे यांना तर पेडर रोडवरील रॉयलस्टोन बंगला राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला आहे.

नव्यानेच मंत्री झालेल्या भरत गोगावले यांना सुरुची (0-2) निवासस्थान देण्यात आले आहे. गिरीश महाजन यांना सेवासदन तर गुलाबराव पाटील यांना जेतवन बंगला देण्यात आला आहे. आदिती तटकरे यांचे आधीचेच प्रतापगड (अ-5) निवासस्थान कायम ठेवले आहे.

गणेश नाईक यांना पावनगड (ब-4), धनंजय मुंडे यांना सातपुडा, हसन मुश्रीफ यांना विशाळगड (क-8), संजय शिरसाट – अंबर 38, प्रताप सरनाईक – अवंती 5, मकरंद पाटील – सुरुची 03, दादा भुसे -जंजिरा (ब-3) तर नरहरी झिरवळ यांना सुरुची 09 निवासस्थान देण्यात आले आहे.

विधानसभाध्यक्ष-सभापतींनाही निवासस्थान

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी हे शासकीय निवासस्थान देण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना सुधीर मुनगंटीवार यांचे 101 हे दालन देण्यात आले आहे. आधीच्या मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यांची दालने कायम ठेवण्यात आली आहेत.