
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित कामे लवकरात लवकर सोडवण्यासाठी नियोजन करा आणि ती कामे वेगाने पूर्ण करा, अशी सूचना जोगेश्वरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विविध विभागांच्या अधिकाऱयांबरोबर झालेल्या बैठकीत केली. बैठकीत 41 प्रलंबित कामांबद्दल चर्चा करून आढावा घेण्यात आला.
जोगेश्वरी विधानसभेतील प्रलंबित कामांबद्दल चर्चा करून त्यांचा आढावा घेण्यासाठी आमदार रवींद्र वायकर यांनी पालिकेच्या के/पूर्व विभागीय कार्यालयात बैठक घेतली. ज्या विकासकांनी पालिकेकडे सुपूर्द करावयाच्या सुविधा अद्याप दिलेल्या नाहीत त्यांना नोटिसा पाठवून त्यांची कामे थांबवावीत, त्यांच्या कुठल्याही कामांना परवानगी देऊ नये, अशी सूचना वायकर यांनी पालिका व संबंधित अधिकाऱयांना दिल्या. नवलकर मार्पेटचा पुनर्विकास करताना वाहन पार्पिंगचा प्रश्न अधिकाऱयांनी सोडवावा. जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात येणाऱया पादचारी पुलावर सरकते जिने जोडावे अशा सूचना वायकर यांनी केल्या. यावेळी नगरसेवक बाळा नर, प्रवीण शिंदे, उपायुक्त पराग मसुरकर, सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे, उपविभागप्रमुख जयवंत लाड, पैलाशनाथ पाठक, बाळ साटम, शाखाप्रमुख नंदू ताम्हणकर, प्रदीप गांधी, मंदार मोरे, सुभाष मांजरेकर, अमर मालवणकर, नितीश म्हात्रे, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.
सुभाषनगर, मकरानी पाडा, सत्यम इंडस्ट्रीज येथील ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पीएमजीपी इमारतीतील अंतर्गत सिवरेजची लाइन नव्याने टाकण्यासाठी आमदार निधी देण्यात येईल, असे आश्वासन वायकर यांनी दिले.































































