भाजपा नेत्यांचे सर्व आरोप मोदींना लागू होताहेत – उदय सामंत

राजकारण आणि विरोध कधी करावा हे भाजपला समजले पाहिजे. देशाची लॉकडाऊनकडे वाटचाल सुरू आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हाही लॉकडाऊन जाहीर करतील, अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्स करताहेत, पण मोदी काय करताहेत? पश्चिम बंगालमध्ये एवढ्या मोठ्या सभा होताहेत. भाजपाचे नेते जे आरोप करताहेत ते सर्व आरोप मोदींना लागू होत असल्याचा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला.

कणकवली तहसील कार्यालय येथे कणकवली वैभववाडी देवगड या तीन तालुक्याच्या कोविड आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, गटविकास अधीकारी अरुण चव्हाण, कणकवली मुख्याधिकारी अवधूत तावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. सी. एम. शिकलगार, डॉ. सतीश टाक, डॉ. गणेश चौगुले उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेताना अधिकार्‍यांकडून समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी तिन्ही तालुक्यात कोविड सेंटरचे बेड वाढण्याबाबत सुचना केल्या. बाहेरगावाहून आलेल्या सर्वांची रॅपिड टेस्ट करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या