
केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर आंदोलन करत आहे. त्यांच्याशी साधी चर्चासुद्धा करायला यांना वेळ नाही. तसेच, मोदी सरकारच्या अडवणुकीमुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत आले असल्याचे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.
महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्य़ांबरोबर आहे. भाजपची मंडळी फसवी असल्यामुळे राज्यात तीन पक्षांनी मिळून सर्वसामान्य जनतेसाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. भाजपने खोटे निकष लाकून फसवी कर्जमाफी केली होती. आता महाविकास आघाडी सरकारने साधेसोपे निकष लावून ‘महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजने’च्या माध्यमातून शेतकऱ्य़ांची कर्जमाफी केली आहे, असेही कदम यांनी सांगितले. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत सोलापुरातील काँग्रेस कमिटी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली.
कोरोनामुळे दीड वर्षापासून राज्य शासनाचे उत्पन्न कमी झाले आहे. केंद्रातील मोदी सरकार तीस हजार कोटींची जीएसटीची रक्कम देत नाही, त्यामुळे आज राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता मोदी सरकारकडून पहिला लॉकडाऊन केला गेला. कोटय़कधी लोक रस्त्याकर भुकेने व्याकुळ चालत गावी गेले. महाराष्ट्राला जाणीवपूर्वक लसी व रेमडेसिविर, औषधांचा पुरवठा कमी करण्यात आला. पण महाविकास आघाडी सरकारने धाडसी पाऊल उचलून कोरोनापासून संरक्षण करणे, उपचार करणे, कार्यक्षम आरोग्य सुविधा उभारल्या, आरोग्यासाठी भरपूर निधी दिला, यामुळे आज कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे, असेही कदम यांनी सांगितले आहे.
खासदार संजय राऊत यांच्या विचाराने सरकार स्थापन झाले
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या विचाराने महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. असा विचार त्यांनी केला ते बरेच झाले, असे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले. सोलापूर दौऱ्य़ावर असताना डॉ. विश्वजित कदम यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.



























































