धक्कादायक! सेक्स रॅकेट चालवण्यासाठी अल्पवयीन मुलींना देत होते इंजेक्शन

crime

सामना ऑनलाईन । हैदराबाद

शरीरसंबंधांसाठी तेलंगणच्या हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलींना इंजेक्शनद्वारे हार्मोन देऊन वयात आणलं जात होतं. या घटनेप्रकरणी एकाच परिवारातील ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील ११ जणींची सुटका करण्यात आली आहे. या अल्पवयीन मुलींपैकी काही मुली या ७ वर्षाच्या आतील आहेत. त्यांना आता सरकारी कन्या आश्रमात पाठवण्यात आले आहे.

हैदराबादमध्ये गणेश नगर कॉलनीत सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. यामध्ये एका डॉक्टरच्या मदतीने अल्पवयीन मुलींना हॉर्मोनचं इंजेक्शन देऊन वयात आणलं जायचं. मुलींना लाख – दीड लाख रुपयांना विकून त्याच्याकडून देहविक्रीसाठी त्यांचा वापर केला जात होता. सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला तेव्हा एकाच परिवारातील ८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी ६ जण मुलींची तस्करी करणारे होते