
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर तालुक्यातील मुरुड येथून महाविद्यालयीन युवती बेपत्ता झाली आहे. या संदर्भात मुलीचे वडील बालाजी शिवाजी कापसे यांनी मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेणारी त्यांची मुलगी ५ तारखेस मैत्रिणीच्या घरातून गावाकडे जाण्यासाठी दुपारी निघाली परंतु ती गावी पोहचलीच नाही. अज्ञात व्यक्तीने तिला फुस लावून पळवले असल्याची तक्रार दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































