अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दुप्पट वाढ, आता चार हजार रुपये मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील अल्पसंख्याक समाजातील तरुणांचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना दर महिन्याला दोन हजार रुपये विद्यावेतन दिले जात होते. आता या विद्यार्थ्य़ांना चार हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल अशी माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री  नवाब मलिक यांनी दिली.

मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ज्यू समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे म्हणून यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अल्पसंख्याक समाजातील निवडक, होतकरु विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण दिले जाते. राज्य प्रशासकीय संस्थेच्या मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि संभाजीनगर येथील प्रत्येक केंद्रामध्ये दहा विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते. या विद्यार्थ्यांना सरकारच्या निर्णयाचा फायदा होईल. विद्यावेतनातील ही वाढ 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षापासून लागू होईल.