Mira Bhayandar – जय गुजरात…, 50 खोके एकदम ओक्के, प्रताप सरनाईक गो बॅकच्या घोषणा; आंदोलकांनी ‘मराठी मोर्चा’तून मिंधेंच्या मंत्र्याला हुसकावून लावलं

मीरा-भाईंदरमधील ‘मराठी मोर्चा’त गेलेल्या मिंधेंच्या मंत्र्याला मराठी जनांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मिंधेंचे मंत्री प्रताप सरनाईक यांना मोर्चातून हुसकावून लावले. जय गुजरात…, 50 खोके एकदम ओक्के…, गो बॅक… गो बॅक… प्रताप सरनाईक गो बॅक… अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. यावेळी प्रचंड विरोध करत मोर्चेकरांनी प्रताप सरनाईक यांना हुसकावून लावले.

हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झालीय; हिंदी आमची ‘लाडकी बहीण’, मिंधे आमदार प्रताप सरनाईक यांची मुक्ताफळं

मीरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्त्वात हा मोर्चा निघाला. पोलिसांनी नकार दिल्यानंतर ही मोर्चा निघालाच. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. या मोर्चात मिंधेंचे मंत्री प्रताप सरनाईकही काही वेळाने सहभागी झाले. निघालेला भव्य मोर्चा पाहून सरनाईक मोर्चाचे श्रेय घेण्यासाठी आले. मी मराठी लिहिलेली गांधी टोपी घालून ते मोर्चात सहभागी झाले. मात्र, प्रताप सरनाईक येताच मोर्चातील आंदोलकांनी त्यांना तीव्र विरोध केला. जय गुजरात…, गो बॅक… गो बॅक… प्रताप सरनाईक गो बॅक…, 50 खोके एकदम ओक्के…, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

म्हणे निशिकांत दुबे सरसकट मराठी माणसाला बोललेच नाहीत; देवेंद्र फडणवीसांची बोटचेपी भूमिका

यावेळी सरनाईक यांच्या दिशेने बॉटलही भिरकावण्यात आली. आंदोलकांचा तीव्र विरोध पाहून अखेर प्रताप सरनाईक यांना मोर्चातून निघून जावे लागले. आंदोलकांच्या विरोधामुळे प्रताप सरनाईक माघारी फिरले आणि विधिमंडळ अधिवेशनासाठी मुंबईला गेले.